सातार्याचा आणखी एक अभिमान , सातार्याची नाईट मॅरेथॉन !!

Jan 10th, 2019

साताऱ्याचे नाव मॅरेथॉन सिटी असे प्रसिद्ध झाले आहेच त्याच बरोबर महाराष्ट्रा ची पहिली आणि भारतातील दुसरी अशी नाईट मॅरेथॉन घेण्याचा मान हि सातार्याने पटकावला आहे , दोन जुनं २०१८ रोजी साताऱ्यात महाराष्ट्रातील पहिली नाईट मॅरेथॉन पार पडली होती , दिल्ली , दार्जलिंग , बंगलोर , चेन्नई , हैद्राबाद , गोआ अश्या देशभरातून अनेक ठिकाण हुन लोकांनी ह्या साताऱ्याच्या नाईट मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता . ह्या नाईट मॅरेथॉन चे अजून एक वैशिष्ठ म्हणजे हि मॅरेथॉन देशातील पहिली कस्टमाइज्ड मॅरेथॉन ठरली आहे ज्यात रनर च्या प्रत्येक मेडल वर व टीशर्ट वर त्या त्या रनर चे नाव असते . ह्याच बरोबर हि दहा , एकवीस व बेचाळीस किलोमीटर ची साताऱ्यातील पहिली फुल मॅरेथॉन असल्याचाही मान ह्या मॅरेथॉन ने पटकावला आहे.

साताऱ्यात गेले तीन वर्ष सातत्त्यांनी स्पोर्ट्स आणि फिटनेस च्या क्षेत्रा मध्ये काम करत असणारी एएफएसएफ फौंडेशन हि संस्था लिव्ह फिअरलेस हे ब्रीद वाक्य घेऊन विशेषतः महिला आरोग्य व सुरक्षा च्या दिशेने एक वाटचाल म्हणून ह्या नाईट चॅलेंजर मॅरेथॉन चे साताऱ्यात आयोजन करते . ह्या संस्थे मार्फत गेले तीन वर्ष दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी एक फ्री रन भारावली जाते ज्याला ते इलसोम म्हणजेच लास्ट संडे ऑफ मंथ असे म्हणतात . त्यांच्या ह्या कार्या ची नोंद घेऊन , HDFC सातारा , कूपर कंपनी , SSE इंडिया अश्या अनेक संथान कडून संस्थेच्या संस्थापिका सौ राजवी हलगेकर ह्यांचा सन्मान केला गेला आहे .

साताऱ्याचे नाव उंचावण्याच्या कार्यात हातभार लावणारी आणि पुन्हा एकदा मॅरेथॉन आणि रनिंग विश्वात साताऱ्याचे नाव राखणारी हि एएफएसएफ सातारा नाईट मॅरेथॉन पुन्हा ह्या वर्षी एक जून रोजी आयोजित केली गेली आहे , एक जानेवारी ला रेजिस्ट्रेशन ओपन होते आणि साधारण एकतीस जानेवारी ला रेजिस्ट्रेशन बंद होते . गेल्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी हि संपूर्ण भारतातून ह्या सातारा नाईट मॅरेथॉन ला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे . ह्याच बरोबर साताऱ्याचे अनेक धावपटू , महिला व जेष्ठ नागरिक हि ह्या मॅरेथॉन मध्ये धावण्यात उत्सुखं असून, एकूण ३००० लोक ह्या नाईट मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याची शक्यता दर्शवली जात आहे .

गेल्या वर्षी झालेल्या ह्या एएफएसएफ सातारा नाईट मॅरेथॉन चे ऑफिसिअल विडिओ लौंचिंग दिनांक १० जानेवारी रोजी हॉटेल ब्लॅक पर्ल , ग्रीनफिल्ड येथे साताऱ्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय श्री युवराज नाईक , साताऱ्याचे पोलीस उपाधीक्षक माननीय श्री समीर शेख व साताऱ्याच्या नगराध्यक्ष माननीय सौ माधवी कदम ह्यांच्या हसते पार पडले , ह्या प्रसंगी एएफएसएफ समितीचे सदस्य मिलिंद हळबे , राजवी हलगेकर , कल्पेश गुजर , पंकज राठी , रेणू येळगावकर , स्वप्नील राऊत , श्वेता राजेमहाडिक , चेतन शिंदे , उमेश लोया , अमेय भागवत , कमलेश भट्टड , पूनम कडू व साताऱ्यातील इतर संस्थेचे अनेक मान्यवर उपस्थित होते .